भाजपने आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केली आहे. धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपमधील सद्यस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.

प्रमोद मुतालिक म्हणाले, भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, मात्र पक्षात सध्या घडणाऱ्या घडामोडी दुर्दैवी आहेत. यत्नाळ हे हिंदुत्वाचा ठाम आवाज आहेत. त्यांच्या निलंबनामुळे अनेक ठिकाणी नाराजी आहे. भाजपने त्यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. तसेच, जर यत्नाळ यांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि त्यांनी आमंत्रण दिले, तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
मात्र त्याआधी भाजपने त्यांना पक्षातच ठेवून समस्या सोडवावी. पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने पाठ फिरवू नये, असा सल्ला देत मुतालिक म्हणाले, भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष राहिला पाहिजे. त्यामुळे यत्नाळ यांचे निलंबन रद्द करून पक्षाने त्यांना संधी द्यावी. आम्ही यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारला निवेदन देणार आहोत.
Recent Comments