बागलकोट जिल्ह्यातील सीगिकेरी गावात सापांचे दुर्मिळ मिलन कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अद्भुत क्षणाने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सीगिकेरी गावातील तळ्याजवळ दोन नाग एकमेकांभोवती गुंडाळत नर्तन करत असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. तासभर हे मिलन दृश्य सुरू होते, ज्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी या दृश्याचा आनंद घेतला, तर काहींनी भीतीपोटी मागे सरकणे पसंत केले.
स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले असून, तो तुफान व्हायरल झाला आहे. माहिती मिळताच सर्पमित्र राज मोहम्मद मदारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही नागांना सुरक्षित जंगलात सोडले.
Recent Comments