khanapur

गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकर सदस्यांनी केली खानापुरातील रेशन दुकानांची पाहणी

Share

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य इसाक खान पठाण यांनी खानापूर शहरातील रेशन दुकानांना भेट देऊन त्यांची पाहणी केली.राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी प्राधिकरणाचे सदस्य इसाक खान पठाण यांनी खानापूर शहरातील रेशन वितरण दुकानांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

निंगापुर गल्ली येथील गरिबी हटाव जनसेवा सहकारी संघाचे दुकान क्रमांक 132 आणि टीएपीसीएमएस खानापूर शाखेचे दुकान क्रमांक 129 या रेशन दुकानांना त्यांनी भेट देऊन लाभार्थ्यांना तेथे रेशन तांदूळ योग्यरित्या वितरित केला जात आहे का नाही याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेशन वितरण दुकानांच्या मालकांना सरकारी आदेशानुसार पात्र रेशनधारकांना रेशन वाटप करण्याच्या सूचना दिल्या. सरकारने रेशन वितरण केंद्रांच्या प्रमुखांना, एका रेशन कार्डवर प्रत्येक व्यक्तीस किती धान्य पुरवठा केला जातो हे सांगणारा सूचना फलक लावण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

रेशन घेण्यासाठी आलेल्यांना तांदळाचा योग्य प्रकारे पुरवठा होत आहे की नाही याची त्यांनी चाचपणी करून राज्य सरकारच्या पाच हमी योजनेचा जनतेने सदुपयोग करून घ्यावा असे इसाक खान पठाण यांनी सांगितले.

Tags: