Uncategorized

कुमारस्वामी भेटीमागील गुपित जारकीहोळींनी केले उघड… म्हणाले….!

Share

दिल्ली दौऱ्यानंतर परतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. दिल्ली दौरा हा फक्त राज्याच्या विकासासाठीच होता. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट हा केवळ योगायोग असल्याचे ते म्हणाले.

दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा दौरा केवळ राज्याच्या विकासासाठीच झाला असून त्यामागे कोणतीही राजकीय कारणे नाहीत. कोणतीही गुपिते नाहीत. उत्तर कर्नाटकातील विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर कर्नाटकातील योजनांसाठी केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांना भेटलो. बागलकोट-कुडची रेल्वे प्रकल्प तसेच कुडची येथे वंदे भारत रेल्वे थांबा निश्चित करण्यासाठी प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा केली. तसेच, बेळगावसाठी बंद करण्यात आलेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठीही चर्चा झाली, असे जारकीहोळी यांनी सांगितले. देवेगौडा यांची भेट ही पूर्णतः योगायोगाने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, हनी ट्रॅप प्रकरणाबद्दल बोलताना जारकीहोळी म्हणाले की, याबाबत कोणतेही रहस्य नाही. पक्षश्रेष्ठींकडून याबाबत माहिती घेतली जाईल आणि मला यावर स्वतंत्रपणे काही सांगण्याची गरज नाही. यात काहीही लपवण्यासारखे नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Tags: