शिक्षक जसे घडवतात, तसे विद्यार्थी घडतात आणि समाजाची निर्मिती होते. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायला हवा. तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी वीणा बिदरी यांनी सांगितले.

शुक्रवारी बेळगावच्या कुमारगंधर्व कला मंदिरात कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा आणि शहर शाखेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम , महिला सशक्तीकरण कार्यशाळा तसेच राणी चन्नम्मा सेवा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्य अतिथी म्हणून उपमहापौर वाणी जोशी, सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक लीलावती हिरेमठ, संयुक्त संचालक विनयकुमार, बीईओ रवी भजंत्री, जयकुमार हेबळी, रमेश गोणी, बाबू सोगलण्णावर, कृष्णा राचण्णावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक जसे घडवतात, तसे विद्यार्थी घडतात आणि समाजाची निर्मिती होते. विद्यार्थी घरापेक्षा जास्त वेळ शिक्षकांसोबत घालवतात आणि त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायला हवा. तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
स्त्री जीवनात एकटी असली तरी धैर्याने यश संपादन केलेल्या अनेक उदाहरणे आहेत. समाजासाठी महिलांनी दिलेले योगदान आणि जीवनातील त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर बीईओ रवी भजंत्री यांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी आर.टी. बळिगार, रमेश अण्णिगेरी, रेखा अंगडी, अंजना मुरगोड, शैला हंपीहोळी, रुद्रप्पा हैबत्ती, सुमा दोडमणी, हेमा अंगडी, चंद्रशेखर कोलकार, अक्कमहादेवी हुलगबाळी यांसह शिक्षक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments