बेळगावच्या रविवार पेठ भागात मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काकावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ही घटना बुधवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास बेळगाव शहरातील रविवार पेठ येथील पाटील मळा भागात घडली. अनिल शरद धामणेकर (वय 46) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आदित्य दीपक धामणेकर आणि अनिल धामणेकर यांच्यात मालमत्तेच्या वादावरून वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या आदित्यने काकावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या अनिल धामणेकर यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश आणि खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.


Recent Comments