आबा स्पोर्ट्स क्लब आयोजित मोफत दिव्यांगांच्या जलतरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे शिबिर दिनांक 3 मार्च ते 18 मार्च पर्यंत गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात घेण्यात आले. या शिबिरामध्ये दिव्यांगा बरोबरच गरीब मुला मुलींना मोफत प्रशिक्षण दिले गेले.
या सर्व प्रशिक्षणार्थींना जलतरण पोशाख व रोज संध्याकाळी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. या शिबिरामध्ये मध्ये 50 पेक्षा जास्त जलतरणपटूंनी भाग घेतला होता. जलतरण प्रशिक्षणच्या अंतिम दिवशी सर्वांना बेळगावचे नवनिर्वाचित महापौर श्री मंगेश पवार तसेच नगरसेवक श्री नितीन जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आबा क्लबचे पदाधिकारी शितल हुलबत्ते,अमर होनगेकर, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार तसेच जलतरणप्रेमी महादेव केसरकर, सतीश पाटील, राजू पाटील, हरीश वाच्छांनी,उमेश कांबळे, विनायक अर्कसाळी, धनराज ग्यानानी,डॉक्टर सागर पाटील हे उपस्थित होते. जलतरणपटूंना प्रशिक्षण देणारे श्री विशाल वेसणे, कलाप्पा पाटील, भरत पाटील, राजश्री पाटील, विजय नाईक, विजय बोगन, निखिल भेकणे, प्रांजल सुळधाळ,शिवराज मोहिते, अमित जाधव, रणजीत पाटील यांचा गौरव महापौर श्री मंगेश पवार व श्री नितीन जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. शेवटी विश्वास पवार यांनी सर्वांचे आभार मानले.


Recent Comments