Belagavi

जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा विचार : जी. एस. संग्रेशी

Share

राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी बुधवारी बेळगावमध्ये आयोजक पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात वाद होता, मात्र तो आता निकाली निघाला आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग तयारी करत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी दिली. मे ३१ पूर्वी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका पार पाडण्यासाठी सरकार उच्च न्यायालयात आरक्षण सादर करणार आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून, निवडणुका केव्हा होणार हे निश्चित सांगता येणार नाही, मात्र शक्य तितक्या लवकर प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा विचार सुरू असून, त्यावर अंतिम निर्णय सरकार पातळीवर होणाऱ्या चर्चेनंतर घेतला जाईल. डिसेंबर अखेरीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार असल्याने त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीपूर्वी दावणगेरे, शिवमोग्गा, तुमकूर, मंगळूर, म्हैसूर येथील महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. कोणत्याही समाजाला किंवा जातिला अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत सरकार आरक्षण निश्चित करणार असून, त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags: