बेळगाव स्मार्ट सिटीच्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या “स्मार्ट सिटी कॉफी टेबल बुक” चा प्रकाश सोहळा आज पार पडला. सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती देणारे “स्मार्ट सिटी कॉफी टेबल बुक” आज अधिकृतरित्या प्रकाशित करण्यात आले. सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्या हस्ते प्रकाश सोहळा संपन्न झाला.
या वेळी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सईदा अफ्रीना बळ्ळारी यांनी स्मार्ट सिटीच्या विकासकामांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असून, या पुस्तकाद्वारे नागरिकांना माहिती देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Recent Comments