Belagavi

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Share

आजच्या पिढीत कौटुंबिक सामंजस्याचा अभाव वाढत असून, त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत, “आदर्श दाम्पत्य” व “आदर्श सासू-सुन” पुरस्कार देऊन समाजाला सकारात्मक संदेश देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे असे महिला उद्योजक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रीमती सुष्मिता क्रिश्चालिन यांनी म्हटले.

क्रांती महिला मंडळ, उमा संगीत प्रतिष्ठान आणि मिराकी इलाईट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘ आदर्श दाम्पत्य” व “आदर्श सासू-सुन ‘ पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यान्ग उपस्थित होते. श्रीमती सुष्मिता क्रिश्चालिन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी श्रीमती सुष्मिता क्रिश्चालिन यांना अवार्ड ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .आदर्श दाम्पत्य पुरस्कार श्रीमती मंगल आणि श्री गुरुवय्या कागतीकर यांना तर आदर्श सासू-सुन पुरस्कार रश्मी चौगले व पद्मावती चौगले यांना मिळाला.
सितारवादक अरुंधती सुखटनकर यांना प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रेमा उपाध्ये यांनी मोहक नृत्य सादर केले. तसेच, अश्विनी शंकरगौडर, रेश्मा दिवटे, वाणी कारेकर, अश्विनी मलघान आणि श्रद्धा जक्कण्णवर यांनी मुलांसाठी व महिलांसाठी विशेष फॅशन शोचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात रोहिणी इंडी, दर्शना निलजगी आणि पद्मजा तुरमंदी यांच्या स्वागत गीताने झाली. अध्यक्षा मंगल मठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर क्रांती महिला मंडळाच्या सचिवा भारती रत्नप्पगोळ यांनी प्रास्ताविक केले.

त्रिशिला पायप्पनवर व अक्षता पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुष्पा निलजगी व राजश्री कागवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी ममता पत्रावळी यांनी आभार प्रदर्शन केले.

Tags: