बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी जवळील बडेकोळ्ळ मठाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक, दोन बस आणि एका दुचाकीचे साखळी अपघात झाले.

एका लॉरीने बसच्या मागून धडक दिली, दुसऱ्या बसने दुचाकीला धडक दिली आणि अचानक ब्रेक लावलेले कंटेनर वाहनही उलटले.थोडक्यातच मोठा अनर्थ टळला . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु काही जणांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
Recent Comments