भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोघे सेक्युरिटी गार्डस बेशुद्ध पडल्याची घटना बेळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर येथे घडली आहे.
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात इंद्रप्रस्थ नगर येथील 2 सिक्युरिटी गार्ड गंभीर जखमी झाले. भटक्या कुत्र्यांनी अपार्टमेंट मध्ये घुसून सकाळी 5.30ला हल्ला करून त्यांच्या पायल चाव घेतला, ते इतका भयानक होत की रक्तस्त्राव होऊन सिक्युरिटी गार्ड बेशुद्ध पडला.जखमी गार्डना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवघ्या एक दिवसापूर्वी गणेशपूर येथे एका मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असतानाही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा संताप इंद्रप्रस्थ येथील जनतेने व्यक्त केला आहे.
माहिती मिळताच नगरसेवक नितीन जाधव व इतरांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेऊन उपचाररसाठी मदत केली.


Recent Comments