Bagalkot

पोलीस क्वाटर्समध्ये भल्या सकाळी सिलिंडरचा स्फोट : सुदैवाने जीवितहानी टळली

Share

भल्या सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन कानठळ्या बसविणारा आवाज झाला. मात्र, सुदैवाने प्राणहानी झाली नाही. बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी गावात ही घटना घडली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी शहरातील पोलीस क्वाटर्समध्ये पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र दळवाई यांच्या घरात आज सकाळच्या प्रहरी सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि लोकांच्या हृदयाचे ठोकेच चुकले.

पण सुदैवाने या स्फोटात जीवित हानी झाली ननसल्याचे समजताच शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
सिलिंडर स्फोटामुळे आगीचा भडका उडल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

Tags: