Belagavi

संगीत ही एक अद्भुत निर्मिती : एम. डी. पल्लवी

Share

संगीत हा आपल्या जीवनाचा मूलभूत गाभा आहे.संगीत हे ऐकणाऱ्याला आनंदच देत नाही तर त्यांचा ताण-तणाव देखील कमी करते. इतकेच नाही तर संगीत ही एक अद्भुत निर्मिती आहे जी आरोग्य, एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते असे गायिका एम. डी. पल्लवी म्हणाल्या.

बेळगाव मधील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे लिंगायत महिला समाजाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित “नाद पल्लवी” या संगीत संध्या कार्यक्रमात एम. डी. पल्लवी बोलत होत्या.

ज्या पवित्र भूमीवर बेलवडी मल्लम्मा, वीरराणी कित्तूर चन्नम्मा, अक्कमहादेवी यांनी पाऊल ठेवले त्या भूमीवर जन्मलेल्या स्त्रिया धन्य आहेत. प्रत्येक महिलेने असे धाडसी आणि आध्यात्मिक गुण आत्मसात केले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमांतर्गत एम.डी. पल्लवी यांनी गायिलेल्या विविध गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महिला उद्योजक लक्ष्मी बगली, सुनीता पाटील आणि रश्मी अगडी यांचा सत्कार करण्यात आला.
लिंगायत महिला समाजाच्या अध्यक्षा सुनीता पाटील, सचिव शारदा पाटील, समन्वयक विद्या गौडा यासह इतर मान्यवर महिला यावेळी उपस्थित होत्या.

Tags: