काल संध्याकाळी जीआयटीच्या आयरा कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात प्रसिद्ध बहुभाषिक गायक सोनू निगम यांच्या संगीत संध्याने बेळगावकरांची मने जिंकली.
के.एल. एस. जीआयटीचा आयरा 2025 कार्यक्रम हा उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील पदवीधारांसह, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य शाखेतील 6000 हुन अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यापूर्वीही झालेल्या कार्यक्रमातून दिवंगत के के, अमित त्रिवेदी, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, अरमान मलिक, फरहान अख्तर, विशाल आणि शेखर, नीती मोहन, बेनी दयाल, श्रेया घोषाल आणि इतर प्रसिद्ध गायकांनी या व्यासपीठाची शोभा वाढवली होती. कन्नड मराठी आणि हिंदी गाणी सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवत आणि श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत सोनू निगम यांनी ही परंपरा अबाधित ठेवली.


Recent Comments