Belagavi

परिवहनचाअनागोंदी कारभार : बस प्रवाशांना उभे राहावे लागले ताटकळत

Share

बेळगाव केंद्र बस स्थानकातून गोककला जाण्यासाठी परिवहन महामंडळाची बस नसल्याने वैतागलेल्या प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

बेळगाव केंद्र बस स्थानकातून गोकाकला जाण्यासाठी प्रवासी प्रतीक्षेत होते. मात्र येथून गोकाकला जाण्यासाठी बस नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यामुळे काही काळ येथे सावळा गोंधळ निर्माण झाला होता.


बेळगावहून गोकाकला जाण्याकरिता परिवहन महामंडळाने बस सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत प्रवासी बस स्थानकावर ताटकळत उभे होते. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आणि त्याने परिवहन कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना चांगलेच धारेवर धरले.

गोकाकसह त्या मार्गावर येत गावांना जाणाऱ्या लोकांना बस नसल्याने ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे या प्रवाशातून संताप व्यक्त होत होता. या संताप्त प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या अनागोंदी कारभाराबद्दल राग व्यक्त केला आहे..

Tags: