Belagavi

सुनेने केला सासू वर कोयत्याने वार

Share

बेळगाव तालुक्यातील मावीनकट्टी येथे सुनेने आपल्या 80 वर्षीय सासूवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत वृद्ध सासू जखमी झाली असून तिला उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

सासु सुने मध्ये वारंवार होणाऱ्या भांडणामुळे वैतागून मुलाने पत्नीला घेऊन वेगळी चूल मांडली होती. वेगळी चूल मांडली असतानाही काल रात्री नवरा आपल्या आईच्या घरी जेवावयास गेल्याने पत्नीच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. आईच्या घरी जेवण करून पती घरी येतात पत्नीने त्याच्याशी भांडण काढले.

वाद वाढल्याने संतप्त पत्नीने घरातील कोयता घेऊन थेट सासूची खोली गाठली आणि तिने सासूशी भांडण काढून सासूवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सासूच्या हाताला गंभीर जखम झाली असून तिला उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शिल्पा नागराज हूदली असे कोयत्याने हल्ला करणाऱ्या सुनेचे तर जानव्वा हुदली असे जखमी सासूचे नाव आहे.

मागील अनेक वर्षांपासून या सासु सुने मध्ये वाद आहेत या वादातून सासु सुनेने अनेकदा पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. काल रात्री नागराज हा आपल्या आईकडे जेवणात गेला होता. याचा राग मना धरून नागराजची पत्नी शिल्पा हिने आधी नवऱ्याशी वाद घातला आणि नंतर आपल्या 80 वर्षीय सासू जानव्वा हिच्याशी वाद घालून तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. जखमी जानव्वा हिला उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

सुन शिल्पा हिने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, सासूने स्वतःला जखम करून घेऊन हल्ल्याचा आरोप माझ्यावर केला आहे असे सांगत मी कोयत्याने हल्ला केलेला नाही असे स्पष्टीकरण दिलेले आहे. मारीहाळ पोलीस ठाणा कार्यक्षेत्रात ही घटना घडली असून मारीहाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags: