Belagavi

मार्केट पोलिसांनी केली सोनसाखळी चोरट्यांची टोळी जेरबंद : केले 143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त

Share

बेळगाव : प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे

बेळगाव केंद्रीय बस स्थानकावरून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या या सोनसाखळी चोरांच्या गॅंगला मार्केट पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले आहेत.
अनिता चौगले (58), निशा लोंढे (25) आणि गिड्डी लोंढे (35) सर्वजन राहणार बेळगाव, गॅंगवाडी -वड्डरवाडी अशी अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाकडून 12 लाख 70 हजार रुपये किमतीचे 143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या चोरट्यांनी हुबळी येथील रहिवासी कांचन गौडर यांची सोन्याची साखळी चोरली होती. याप्रकरणी कांचन गौडार यांनी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर, मार्केट एसीपी संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बेळगाव मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: