Belagavi

विवस्त्र करून महिलेला मारहाण : उगरगोळ गावात जमीन वादातून घडली घटना

Share

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावात एका महिलेला विवस्त्र करून महाराणा करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजाला लाजवेल अशा या घटनेबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 10 एकर शेत जमिनी संदर्भात नणंद आणि भावजय यांच्यातील वादातून ही घटना घडली आहे.
शाब्दिक वाद शिगेला पोहोचला आणि यामध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

नणंद आणि भावजय यांच्यात जमिनीचा वाद आहे. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नणंदेने शेत जमिनी संदर्भात नकली दस्तावेज तयार केल्याचा आरोप भावजयीने न्यायालयात केला आहे. नणंदेने त्या जमिनीवर पीक घेऊ नये अशी सूचना वजा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असताना आम्ही शेतकरी संघाचे लोक आहोत असे सांगून काही लोकांनी त्या जमिनीवर पीक कापायला सुरुवात केली. याला विरोध केला असता त्या लोकांनी विरोध करणाऱ्या महिलेला विवस्त्र करून जबर मारहाण केली.

त्या लोकांतून सुटका करून घेऊन त्या महिलेने शिवारातून पळ काढला आणि 112 क्रमांकाला फोन केला काय चालत पोलीस घटनास्थळी दाखल झाले तरीही पोलिसासमक्ष त्या महिलेला पुन्हा अर्वाच्च शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. काहींनी रुग्णवाहिकेला बोलाविले पण रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने तिथून जाणाऱ्या खाजगी वाहनाला अडवून त्यामधून त्या जखमी महिलेला खाजगी इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्या महिलेवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी तिला धारवाड येथील शासकीय इस्पितळात हलविण्यात आले.

30 एकर जमिनीपैकी केवळ दहा एकर जमीन आपल्याला द्यावी, या मागणीलाही ननंद राजी नव्हती. याच वादातून एक वर्षापूर्वी आपल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या जमिनी शिवाय आपल्याकडे उपजीविकेचे दुसरे साधन नाही. असे असताना या जमिनीसाठी आपल्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.या संदर्भात पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या सीपीआयनेही आपली फिर्याद दाखल करून घेतली नाही. असे पीडित महिला रत्ना अन्नप्पा पट्टणशेट्टी या महिलेने सांगितले आहे.

महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे सांगत या घटने संदर्भात राग व्यक्त केला आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेणे शंकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tags: