Dharwad

हिट अँड रन : पोलिसांनी घेतले वाहन ताब्यात

Share

सोमवारी दुपारच्या सुमारास धारवाडमधील होयसळ नगराजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या हिट-अँड-रन प्रकरणी धारवाड रहदारी नियंत्रण विभाग पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या लॉरीला चित्रपटीतील दृश्याप्रमाणे पाठलाग करून त्याला पकडण्यात यश मिळविले आहे.

धारवाडबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर बेळगावकडे जाणाऱ्या केरळ नोंदणीकृत असलेल्या एका ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला. या अपघातात धारवाडमधील कुमारस्वामी नगर येथील रहिवासी सुभाषचंद्र कोरे नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. धारवाड वाहतूक पोलिसांनी चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने हिट-अँड-रन प्रकरणाचा तपास करीत केरळ नोंदणीकृत वाहन ताब्यात घेतले.

पकडलेले वाहन तेगूरजवळील पोलिस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई केली गेली. याप्रकरणी धारवाड वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags: