बेळगाव : के. के. कोप्प प्रीमियर लीग (केपीएल) – 2025 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील के. के. कोप्प गावात हर्षा शुगर्स यांच्या वतीने के. के. कोप्प प्रीमियर लीग (केपीएल) – 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा
काँग्रेस नेते यांच्या हस्ते या स्पर्धेला समारंभपूर्वक चालना देण्यात आली.

या क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण भागातील विविध गावातील क्रिकेट संघांनी भाग घेतला आहे. काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी एसटी पूजन करून आणि हिरवा बावटा दाखवून स्पर्धेतील उद्घाटन पर सामन्याला चालना दिली.
यावेळी विविध क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू, गावातील प्रमुख नागरिक आणि क्रिकेट प्रेमी बहुसंख्य उपस्थित होते.


Recent Comments