Belagavi

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या गावपंचावर जीवघेणा हल्ला

Share

भांडण सोडविण्यास गेलेल्या गावपंचावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील सुतगट्टी गावात सोमवारी ही घटना घडली आहे.

क्षुल्लक कारणावरून निंग्यानट्टी आणि उक्कड गावातील तरुणांमध्ये कधी वाद तर कधी हाणामारी होत होती. मुलांची समजून काढून कायमस्वरूपी हा वाद मिटववा या उद्देशाने सोमवारी गाव पंचांनी सुदगट्टी गावातील तरुणांना बोलावून घेतले. यावेळी संतप्त झालेल्या सुदगट्टी गावच्या 20 ते 25 जणांच्या तरुणांच्या टोळक्याने , ‘ आम्हास बुद्धी शिकवतोस का ? असे म्हणत मारक हत्याराने गाव पंचावरच जीवघेणा हल्ला केला.

यासंदर्भात ईन न्यूजशी बोलताना सिद्धाराय नायक म्हणाले दोघांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या उक्कडचा मारुती आणि दुर्गेश त्यांच्यावर आधीच खटले सुरू आहेत. पण त्यांना अटक करण्याऐवजी राजकीय दबावामुळे सोडले जात आहे. पोलीस प्रशासनाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सतीश नायक यांनी केली आहे.

निंग्यानट्टी गावातील सिद्धराय नायक (36) आणि आकाश तळवार (38) यांच्यावर दुर्गेश बेनकोळी, श्रीधर कनबरगी, कमलेश, कुमार आणि मारुती यांनी रॉड आणि धारदार शस्त्रांनी डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Tags: