Belagavi

राज्यात चाललाय तुघलकी कारभार : गॅरंटी योजना कुचकामी : बी.एस. येडीयुरप्पा

Share

राज्य काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजना निरर्थक ठरल्या आहेत. राज्य सरकारने अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकला महत्त्व दिलेले नाही. पुढच्यावेळी राज्यात निश्चितपणे भाजपचेच सरकार सत्तेत येणार असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.

आज बेळगाव येथील सांबरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना बी.एस. येडीयुरप्पा यांनी, राज्यात भाजपची लाट आहे. येत्या काळात राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येईल. यासाठी एकजुटीने प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे म्हटले.

गॅरंटी योजनांमुळे राज्याचा विकास खुंटला आहे का ? या प्रसार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, गॅरंटी योजना निरर्थक आहेत. त्या फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्याही गॅरंटी योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. एकप्रकारे तुघलकी कारभार चालला आहे, असे बी.एस. येडीयुरप्पा म्हणाले.

अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकाला जे महत्त्व दिले गेले पाहिजे होते ते दिले गेले नाही. एक प्रकारे उत्तर कर्नाटकावर अन्याय केला गेला आहे. हे सर्वज्ञात आहे. अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी कंत्राटांमध्ये 4% आरक्षण देणे योग्य नाही, असेही बी.एस. येडीयुरप्पा यावेळी बोलताना म्हणाले.

Tags: