अंधश्रद्धा ही महिलांसाठी घातक असते आजही गावागावात, गल्ली -गल्लीत अंधश्रद्धेचे प्रकार पहावयास मिळतात. अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे काळाची गरज आहे. यासाठी अंधश्रद्धे विरोधात उभे राहूया असे महिलां आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
महिला दिनाचे औचित्य साधून जीडी मीडिया हाऊस यांच्या वतीने बेंगलोर येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित साधकी पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या.
महिला या केवळ अबला नाहीत तर त्या सबला आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजात कार्य करतात. आज महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. महिलांनी स्वतःला सक्षम बनविले पाहिजे. आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण आणि उच्च शिक्षण देऊन घडवावे असेही त्या म्हणाल्या.

आजच्या आधुनिक युगात महिलांनी कोणतेच क्षेत्र सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रात त्यांनी पुरुषांसोबत मजल मारली आहे, मुसंडी मारली आहे. घर परिवार असो वा समाज असो, महिला सर्वत्र खंबीरपणे उभ्या आहेत असेही हेब्बाळकर यांनी म्हटले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर नागलक्ष्मी चौधरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कुमार, चित्रपट अभिनेते अनिरुद्ध जतकर अभिनेत्री संपदा, कार्यक्रमाच्या आयोजक जीडी मीडिया हाऊसच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता गौडा, हेमा सागर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments