चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर गावामधील श्री वीरभद्रेश्वर भद्रकाली देवीच्या कल्याण महोत्सवाचे औचित्य साधून महिला भाविकांच्यावतीने श्री वीरभद्रेश्वर चांदीच्या रथोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते

श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्या शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सिंदगी येथील नारंग मठाचे डॉ. प्रभूसारंगदेव शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत रथोत्सव सोहळ्याला चालना देण्यात आली.
महिला भाविकांनी अत्यंत भक्ती भवानी चांदीचा रथ ओढला.
‘हर हर महादेव ‘आणि ‘ श्री वीरभद्रेश्वर महाराज की जय ‘ च्या जयघोषानी यावेळी आसमंत दणाणून गेला होता. रथोत्सवावेळी भाविकांनी खारीक, खोबरे, साखर, नारळ आणि केळी, फळे अर्पण करून वीरभद्रेश्वराचे दर्शन घेतले.
काडसिद्धेश्वर मठापासून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. श्री वीरभद्रेश्वर देवस्थान,चन्नम्मा चौक, जुने येडूर मार्गे श्री वीरभद्रेश्वर देवस्थान येथे आल्यानंतर रथोत्सवाची सांगता करण्यात आली.
रथोत्सव मिरवणुकीत विविध मठाचे मठाधीश भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments