रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारला काँक्रीट भरलेल्या लॉरीने जोराची धडक दिली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून कार चक्काचूर झाली. बेळगाव केएलई इस्पितळा नजीकच्या सर्विस रोडवर आज शनिवारी ही घटना घडली आहे.
काँक्रीट भरलेल्या लोरीच्या ठोकरीने कारचे मोठे नुकसान झाले मात्र, सुदैवाने कारमधील दोघेजण बचावले. अपघातानंतर कारची स्थिती पाहता कार मधील दोघांचे वाचणे हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे.

धारवाडहून कार गाडीनेआलेले दोघेजण केएलई इस्पितळ मार्गावरील सर्विस रोडवर रस्त्या शेजारी कार उभी करून कोणाची तरी वाट पाहात कारमध्ये बसले होते. यावेळी काँक्रीट भरून चाललेल्या लॉरी चालकाचे नियंत्रण सुटल्याने लॉरीची जोरदार धडक रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारला बसली.
या घटनेत कार मध्ये बसलेले दोघेजण कार मध्येच अडकून होते. कारचे प्रचंड नुकसान झाले होते. कार गाडीची परिस्थिती पाहता कारमधील दोघाजणांचे नेमके काय झाले असेल ? असा प्रश्न घटना पाहणाऱ्यांना पडला होता.
यावेळी लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी कारचा पत्रा कापून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. कारमध्ये अडकलेले दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

घटना पाहता त्या दोघांचे नशीब बलवत्तर म्हणूनच या घटनेतून ते बचावले. अग्निशामक दलाच्या जवानांनीही वेळेवर धाव घेऊन कारचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जीव बचावला. क्रेनही अगदी योग्य वेळी आली. परप्पा बाळीकाई आणि निंगाप्पा कोप्पद ( दोघेही राहणार धारवाड) अशी या मरणाच्या दाढेतून वाचलेल्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला हातभार लावणाऱ्या स्थानिक नागरिकांचे खरोखरच कौतुक आहे घटना घडलेल्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. यामुळे काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. उत्तर विभाग रहदारी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments