Banglore

र्जबाजारी विश्वविक्रम करणारा विक्रमवीर म्हणजेच सिद्धरामय्या

Share

अधिकाधिक कर्ज घेऊन कर्जबाजारी विश्वविक्रम करणारा विक्रमवीर म्हणजेच सिद्धरामय्या होय असा शाब्दिक टोला आर. अशोक यांनी हाणला आहे

अर्थसंकल्पीय सादरीकरणात कोणत्याच प्रकारची दूरदृष्टी नसलेली व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होय असा शाब्दिक प्रहार अशोक यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलताना केला. राज्य सरकारने सादर केलेल्या संकल्पावर विरोधी पक्ष चांगलाच तापला असून त्या अनुषंगाने विरोधी पक्षातून राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल शादी फुल आणले जात आहेत

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक लाख 16 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून राज्यातील जनतेला कर्जाच्या बोज्याखाली आणून अडचणीत आणले आहे, असा घणाघाती आरोप विधिमंडळात आज विरोधी पक्षाचे नेते आर अशोक यांनी केला.

आर. अशोक यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्राने वाढविलेल्या कर्जाचा उल्लेख करीत केंद्र सरकारच्या कर्जाकडे बघा असा प्रतिटोला मारला. यामुळे विधिमंडळात काही क्षण गोंधळ माजला.

विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सिद्धरामय्या यांच्यावर कर्जबाजारीपणाचा ठपका ठेवला.. शिवाय राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा दूरदृष्टी नसणारा आणि विकास शून्य अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. यावेळी विधिमंडळात शाब्दिक गदारोळ झाला

कर्ज काढून विकास नको असे सन 2017 मध्ये वक्तव्य करणाऱ्या सिद्धरामयांनी स्वतः कर्जाचा डोंगर उभारून काय साध्य केले आहे आणि आपले म्हणणे कितपत खरे ठरविले आहे असा सवाल करीत सिद्धरामय्याने राज्यातील जनतेच्या डोईवर कर्जाचा डोंगर उभा केला आहे असे आर अशोक यावेळी बोलताना म्हणाले गरज असताना पंचवीस टक्के कर्ज काढू शकतो.

देशावर आज 200 लाख 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. आता राज सरकारकडून 24% आणि केंद्र सरकार 56% इतके कर्ज झाले आहे. 15 लाख 56 हजार कोटी कर्ज केंद्र सरकारने केले आहे. यामुळे आरोप प्रत्यारोप सोडा असा टोला यावेळी मारला गेला.

Tags: