Uncategorized

बेकायदेशीर कृत्यांचा अड्डा बनलेले तिगडी जलाशय

Share

हे जलाशय शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आले आहे. मात्र नियोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे जलाशय उपकारक नव्हे तर शेतकऱ्यांसाठी अपकारक ठरत आहे, समस्यांचे एक स्रोत बनत आहे. अशा या जलाशयाचा हा एक अहवाल .….

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावातील हरिनाल जलाशय समस्यांचे आगर बनले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेले हे जलाशय अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. समस्यांनी ग्रासलेल्या या जलाशयाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. नियोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा यामुळे हे जलाशय या भागातील शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यास असमर्थ ठरत असून गैर कृत्यांचा अड्डा बनले आहे. एकंदर या जलाशयाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे.

अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणी येत आहेत. या भागातील शेकडो एकर जमिनीवरील पिकांना पाणी नसल्याने फटका बसत आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे हे जलाशय असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक आमदारही याकडे लक्ष देत नाहीत. जरी हे धरण अस्तित्वात असले तरी, ते शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात नाही असे दिसून येते. हे जलाशय अनैतिक कृत्यांचे केंद्र बनले आहे.

योग्य नियोजन करून या जलाशद्वारे संबंधित भागातील शिवारांना पाणीपुरवठा करावा इतर जिल्ह्यांना जलाशयाचे पाणी सोडू नये अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे
या जलाशयाचे पाणी हिरेबागेवाडीला देणार नाही असा कडक इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

तिगडी जलाशयाचे अधिकारी मोहम्मद तौफिक बोलताना म्हणाले की, जलशयाकडे सुरक्षा रक्षक नसल्याने हे धरण अनैतिक कृत्यांचे केंद्र बनले होते. सुरक्षा उपविभागाने आता सुरक्षा रक्षकांची नियुक्त केली आहे. तसेच, साफसफाईचे कामही हाती घेतले आहे. तेथे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेण्यासाठी पोलिस विभागालाही कळविण्यात आले आहे. तांत्रिक समस्या सोडवून योग्य नियोजन नाद्वारे शेतकऱ्यांना पाणी दिले जाईल.

तर चला, याबद्दलची अधिक माहिती आम्ही आमचे बैलहोंगल प्रतिनिधी, शानुल मत्तेखान यांच्याकडून घेऊया.

Tags: