बेंगळुर : चित्रपट अभिनेत्री रण्या राव सोने तस्करी प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशीनंतरच या प्रकरणातील खरे सत्य उघडकीस येईल असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी म्हटले आहे. अभिनेत्री रण्या राव सोने तस्करी प्रकरणी एका प्रभावशाली मंत्र्याच्या कथित सहभागाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

गॅरंटी योजना समिती संदर्भात विरोधी पक्षाने छेडलेल्या आंदोलन संदर्भात प्रसार माध्यमांनी विचारणा केली असता लक्ष्मी हेबाळकर म्हणाल्या, सन 2023 मध्ये राज्यात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर गॅरंटी योजना सुरू करण्यात आल्या. लोक हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या गॅरंटी योजना योग्य प्रकारे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुका स्तरावर गॅरंटी योजना समित्या स्थापन करण्यात आल्या. या गॅरंटी योजना समित्या रद्द करण्यासाठी विरोधकांनी धडपड चालवली असून त्याची ही धडपड निरर्थक आहे, असे त्या म्हणाल्या.
कर्नाटक राज्यात गॅरंटी योजनांना विरोध करणाऱ्या भाजप सरकारने इतर राज्यात आमच्याच योजना राबविल्या. कर्नाटक राज्यातील गृहलक्ष्मी योजना महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लाडकी बहीण या नावावर राबविली. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची ही योजना बारगळली. असे हे भाजप सरकार लोकहितासाठी नव्हे तर स्वहितासाठी धडपडणारे आहे असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
आरएसएस हे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचे सहाय्यक आहेत. तिथले सरकार त्यांना मानधन देते. स्वतःकडे दोष ठेवूनहेब्बाळकर इतरांकडे बोट दाखवण्याचे काम हे भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी बोलताना केला.
Recent Comments