Belagavi

चेन्नम्मा विद्यापीठाचे आरपीडी कॉलेजचा निकाल जाहीर

Share

बेळगाव टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालय हे राणी चन्नमा विश्वविद्यालयाशी स्वायत्त झाल्याने बीए, बीकॉम व बीबीए पहिल्या सेमिस्टर चा निकाल पहिल्यांदाच परीक्षेच्या अकराव्या दिवशी घोषित झाला आहे, अशी माहिती एस वाय प्रभू यांनी दिली आहे

बुधवारी आरपीडी महाविद्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.भक्ती राजेश कुरकोटे या विद्यार्थिनीने बीए प्रथम सत्रात 89.90% गुणांसह महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकाविला तर रोहन राजशेखर सनारी याने 88.50% गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.

बीकॉम विभागात पहिल्या सेमिस्टर मध्ये वैभवी दळवाई हिने 87.50% गुण मिळविणे तर शोभा शिंदे हिने 86 टक्के गुण मिळविले. बीबी प्रथम सेमिस्टर मध्ये स्नेहा शेट्टी या विद्यार्थिनीने 83.50% गुण मिळविले तर अँथनी फर्नांडिस याने 80.90% गुण घेतले

बीए विभागात एकूण 141 विद्यार्थी तर बीकॉम मध्ये 99 तसेच बीबीए मध्ये 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा शुल्क म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाचशे रुपये आकारण्यात आले होते अशी माहिती प्रभू यांनी यावेळी दिली.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय पाटील, एम एस कुरळी, प्राध्यापक अरविंद हलगेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: