Belagavi

शाहूनगर येथे रास्ता व गटारी निर्माण काम

Share

बेळगाव शहरातील शाहूनगर येथे गटारी व रोडच्या निर्माण कामाला माजी उपमहापौर व नगरसेविका रेश्मा पाटील यांनी चालना दिली.

बेळगाव शहरातील वॉर्ड नंबर 33 शाहूनगर विनायक कॉलनी येथे गटारी व रोडच्या कामाला नगरसेविका तसेच बेळगावच्या माजी उपमहापौर रेशमा प्रवीण पाटील यांनी चालना दिली. वार्डाच्या अनुदानातून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कॉलनीतील नागरिक ,पंचमंडळी व महिलावर्ग उपस्थित होते. गेली पंचवीस वर्षे न झालेल्या कामाला सुरुवात झाल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Tags: