राज्यातील ९ विद्यापीठे बंद करू नयेत, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानासमोर भिक्षा मागून एक अनोखा निषेध केला.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भीक मागत, राज्यातील ९ विद्यापीठे बंद करू नयेत अशी मागणी करत एक अनोखा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, अ. भा. वि. प. ने राज्यातील सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर भिक्षा मागण्याच्या माध्यमातून एक अनोखी मोहीम सुरू केली आहे.

बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्येही अभाविप निषेध करणार आहे. आर्थिक अडचणीच्या बहाण्याने गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असलेली विद्यापीठे बंद करणे योग्य नाही. अहिंदचे नेते सिद्धरामय्या आणि डी.सी.एम. डी.के. शिवकुमार यांनी या प्रकारचा निर्णय सोडून द्यावा. राज्य सरकारकडे पैसे नसल्याने विद्यार्थी परिषद भिक्षेच्या स्वरूपात पैसे घेईल आणि सरकारला देईल, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर या संदर्भातील निवेदन मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना सादर करण्यात आला. यावेळी पृथ्वी कुमार, कुशल घोडगेरी, रोहित अलकुंटे, सचिन हिरेमठ आणि इतर एबीव्हीएचपी कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments