Belagavi

बेळगावकरांच्या घराचे सौंदर्यावर आणखी भर

Share

सुंदरशा घराचे सौंदर्य हे आकर्षक सजावटीने आणखी छान दिसते. आणि अत्याधुनिक रंगीबेरंगी लाईट्स याच्या सौंदर्याला आणखी भर देतात. स्मार्ट सिटी बेळगावकरांची घरे उजळवण्यासाठी आणि नवीन चैतन्याचा प्रकाश टाकण्यासाठी बेळगावमध्ये फिलिप्स लाईट हब शोरूम सुरू करण्यात आला आहे. यासंबंधी येथे आहे एक रिपोर्ट.

आता काळ बदलला आहे. घर बांधणी – जीवनातील प्रत्येक गोष्टी स्मार्ट हो चालली आहेत. बेळगाव स्मार्टसिटीमधील घरे रंगीबेरंगी लाईट्सने उजळवण्यासाठी माँ फिलिप्स लाईट हब शोरूम बेळगावमध्ये दाखल झाले आहे. सोमवारी सायंकाळी बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील सेकंड गेट व्हॅक्सिन डेपो रोडजवळ मा फिलिप्स लाईट हब शोरूमने आपला कार्यारंभ केला आहे.

फिलिप्स इंडिया कंझ्युमर चॅनेलचे सीईओ अरुण कुमार, फिलिप्स स्मार्ट होम्सचे राज्य प्रमुख विनोद मणी आणि संयोजक भरत पुरोहित आणि यश पुरोहित यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन मा फिलिप्स लाईट हब शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. रंग बदलणारे विविध प्रकारचे लाईट्स, आवाज आणि मोबाईलद्वारे नियंत्रण वैशिष्ट्यांसह लाईट्स, तीव्रता कमी जास्त करू शकणार्‍या वैशिष्ट्यांचे लाईट्स , नवीन डिझाइनचे लाईट्स… अकल्पनीय अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हजाराहून अधिक प्रकारचे लाईट्स येथे उपलब्ध आहेत.

फिलिप्स इंडिया कंझ्युमर चॅनेलचे सीईओ अरुण कुमार म्हणाले की, देशातील ३०४ वे आणि कर्नाटक राज्यातील २६ वे स्टोअर बेळगावमध्ये उघडण्यात आले आहे. हे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे शोरूम आहे. आजकाल तंत्रज्ञान आणि आधुनिकतेनुसार लाईट्स वापरले जात आहेत. फिलिप्स कंपनी देखील शंभर वर्षे जुनी आहे. राहुल द्रविड आमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. आमच्याकडे सुमारे ५६ ब्रँड आहेत. फिलिप्सकडे १००० हून अधिक नमुने आहेत. फिलिप्स फक्त प्रकाश टाकणारे लाईट्स तयार करीत नाही. आवश्यक नैसर्गिक प्रकाश देणारे लाईट्स देखील फिलिप्स तयार करते. फिलिप्सने व्हिटॅमिन डी देणाऱ्या लाईट्सचा अविष्कार केल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक भरत पुरोहित म्हणाले की, फिलिप्सच्या लाईट्सना स्वतःची खासियत आहे. तसेच, सुमारे १० वर्षांनंतरही, फिलिप्सच्या लाईट्सची चमक इतर लाईट्सप्रमाणे कमी होत नाही. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधले जातात. त्याचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी, ते सुंदर लाईट्सनी सजवणे गरजेचे आहे. लाईट्स हे घराचे सौंदर्य वाढवतात. फिलिप्समध्ये ग्राहकांच्या बजेटला अनुकूल असे चांगले लाईट्स उपलब्द आहेत. आमच्या शोरूमला एकदा भेट दिल्यानंतरच तुम्हाला आमच्या उत्पादनांची माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यश पुरोहित यांनी सांगितले कि , १०-१५ वर्षांपूर्वी त्यांचे वडील भरत पुरोहित यांनी बेळगावमध्ये फिलिप्स लाईट डीलर म्हणून आपले काम सुरु केले. आता इथं पर्यंत मजल गाठली आहे. आता, काळाबरोबर, नवीन बदल होत आहेत. येणाऱ्या काळात, सर्वकाही कनेक्टेड होईल. होम ऑटोमेशनमुळे, तुमच्या घरचे सर्व लाईट्सचे कंट्रोलिंग तुमच्या मोबाईलशी जोडले जातील.तुमच्या आवाजानुसार ते चालू आणि बंद होतील. रिमोटने देखील कंट्रोल केले जाऊ शकतात. रंग देखील बदलता येतो.

मग आता वाट का पाहता? फिलिप्स लाईट हब शोरूमला भेट द्या आणि आजच तुमचे आवडते फिलिप्स लाईट्स खरेदी करा

Tags: