बेळगाव तालुक्यातील काकती येथे भरमसाठ घरपट्टी करवाढीचा निषेध करत ग्रामस्थांनी निदर्शने केली.
बेळगाव तालुक्यातील काकती येथील ग्राम पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामस्थांनी घरपट्टी वाढीचा निषेध केला. भरमसाठ घरपट्टी करवाढी मुळे नागरिक हैराण सरकारचा धिक्कार करत गावातून ग्रामपंचायत पर्यंत नागरिक व महिलांनी मोर्चा काढून सरकारने लवकरात लवकर करवाढ मागे घ्यावी असे निवेदन ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षाताई मुचंडीकर व ग्रामपंचायत अधिकारी अरुण नाथबुवा यांच्याकडे देण्यात आले.

काकतीतील महिलांनी आम्हाला सरकारचे 2000 रुपये नको बस प्रवास मोफत नको खरं ही घरपट्टी वाढ व महागाई कमी करा अशी अशा प्रकारे निवेदन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
तसेच काकतील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारच्या या धोरणाचे निषेद करत वैज्ञानिकरित्या घरपट्टी कर आकारण्याची मागणी केली .


Recent Comments