बेळगाव प्रतिनिधी मुजावर गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी नगरसेवक, ज्येष्ठ हॉकीपटू सुरेश गणपतराव खन्नूकर ( वय ८८) यांचे आज शुक्रवार दि.२१ रोजी वृद्ध काळाने आजाराने निधन झाले आहे. ,त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, सून दोन मुली, जावई नातवंडे असा आहे.
ते माजी नगरसेवक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते व मोहन बागान हॉकी क्लबचे माजी खेळाडू आणि बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व मुजावर गल्ली चे पंच होते. अंतसंस्कार आज शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि २४ सकाळी ८ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत आहे.


Recent Comments