चलवादी समाजातील उद्योजकांच्या उन्नतीसाठी आगामी अर्थसंकल्पात सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी कर्नाटक राज्य उद्योजक सेवा संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.महालिंग कोलकार यांनी मागणी केली आहे.

कर्नाटक राज्य उद्योजक सेवा संघ आणि चलवादि महासभेने बेळगाव शहरात आज संयुक्त पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, एकट्या बेळगाव जिल्ह्यात चलवादि समाजाची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. कर्नाटक राज्यात सुमारे ५० लाख लोक आहेत. हा समाज सर्वच क्षेत्रात मागासलेला आहे. अनुसूचित जातींच्या यादीत सुमारे १०१ जातींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अनेक जातींना संधी मिळत आहेत.
त्यामुळे चलवादि समाजाला सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. म्हणून, समाजातील लोकांनी नोकऱ्यांची वाट न पाहता उद्योजक व्हावे. सरकारला कर भरावा आणि सरकारच्या विकासात भागीदार व्हावे.चलवादि समाजाच्या हितासाठी एमएसएमई क्षेत्रात येत्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मार्फत सरकारला लाखो रुपये कर आधीच दिले जात आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी चलवादि समाजाला अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. कर्नाटक राज्य उद्योजक सेवा संघ आणि चलवादि महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Recent Comments