आपल्या देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती मिळेल असे माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले .

आज हुक्केरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार निखिल कत्ती यांनी निडसोशी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी आणि क्यारगुड्ड येथील श्री अभिनव मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत अडवी सिद्धेश्वर मठाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले.
तत्पूर्वी, कोर्ट सर्कलजवळ हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी आणि भवानी दत्तपीठाचे मराठा जगद्गुरु मंजुनाथ भारती महास्वामी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून स्वागत केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज हुक्केरी शहरात हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात आहे हे खूप आनंददायी आहे. शिवाजी महाराजांची देशभक्ती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हिंदुस्थानात देशभक्तीची भावना जागृत होत आहे. नंतर, कुंभमेळ्यासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बेंगळुरू गो साई महासंस्थानात बोलताना जगद्गुरू म्हणाले की, ३९८ वर्षांपूर्वी मानवतेला दिलेला न्याय आणि कायदा, त्यांनी अवलंबलेला मार्ग संपूर्ण भारत आणि जगभरातील मानवतेसाठी आदर्शनीयआहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक नेते आहेत.
सायंकाळी माजी खासदार रमेश कत्ती आणि आमदार निखिल कत्ती यांनी अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर सभेत बोलताना ते म्हणाले कि, जर शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती मिळवायची असेल तर आपण त्यांचे आदर्श अंमलात आणून आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी काम केले पाहिजे.
व्यासपीठावर श्याम सुंदर गायकवाड, संकेश्वर नगरपालिका अध्यक्षा सीमा हतनुरे, अमर नलकिरणसिंग राजपूत, स्वागत समितीचे अध्यक्ष प्रसाद खाडे, रमेश तेरणी, डॉ. सुरेश उपासे, सिद्धेशा बेनाडीकर, महावीर निलजगी, बंडू हतनुरे, अशोक पट्टणशेट्टी व इतर उपस्थित होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवा संघ हुक्केरी आणि संपूर्ण मराठा समाजाचे नेते तसेच जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Comments