Belagavi

हिंडलगा तुरुंगाच्या जॅमरमुळे जनतेला त्रास

Share

बेळगाव हिंडलगा कारागृहाने कारागृहाच्या हितासाठी बसवलेल्या जॅमरमुळे, कारागृहाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत.

बेळगावमधील हिंडलगा तुरुंगात जॅमर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या कमतरतेमुळे तुरुंगाच्या आजूबाजूच्या निवासी भागातील लोकांना गंभीर समस्या येत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आधीच तुरुंग प्रशासनाकडे याचिका सादर करून तुरुंगाची मर्यादा कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या ५ दिवसांपासून, हिंडलगा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील लक्ष्मी नगर आणि विजयनगरसह हिंडलगा कारागृहाच्या आसपासच्या भागातील जनेतला नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अभाव जाणवत आहे.कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि गुगल पे आणि फोन पे सारखे बँक व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीचे काम होत नाहीये, हे खेदजनक आहे. जर हा प्रश्न लवकर सोडवला गेला नाही तर वेंगुर्ला रस्ता रोखून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. नेटवर्कशिवाय माहिती उपलब्ध होत नाही . ग्रामपंचायतीमध्ये सर्व्हरची समस्या जाणवत आहे. त्यामुळे जाणतेची गैरसोय होत आहे. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे.  हिंडलगा तुरुंगाच्या हितासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे तुरुंगाबाहेरील लोकांना त्रास होत असून जॅमरची मर्यादा कमी करण्याची मागणी होत आहे.

Tags: