Belagavi

विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवल्या वस्तू ; बालवीर विद्यानिकेतन शाळेत स्तुत उपक्रम

Share

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना कलागुणांचे वाव देण्यासाठी मातीपासून वस्तू बनविण्याचा एक आगळावेग्गला स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले . शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातीपासून विविध वस्तू तयार करण्यास सांगितले होते.

त्यानुसार इयत्ता शिशुच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मातीपासून कल्पकतेने बैल, बैलगाडी, खेळण्याच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू तयार केल्या. या वेळी शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी भडांगे, सुषमा सुतार, पूजा पाटील, शैला कोळी

यांनी परिश्रम घेतले. तर मार्गदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांचे लाभले

Tags: