मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्यातर्फे आज भव्य अशी शिवजयंती ची मिरवणूक काडण्यात आली. आज १९ फेब्रुवारी २०२५ रोजी खादारवाडी गाव भगवमय करून भव्य अशी शिवजयंती मिरवणूक काडण्यात आली

मिरवणुकीमधे ढोल-ताशा पथक,लाठीमेळा,लेझीम-मेळा,मल्लखांब,तलवार बाजी, व ट्रैक्टर मधे छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ आणि अनेक मर्दानी शूर मावळे वेशभूषा सादर करुन सर्व खादरवाडी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले
शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर व क्रीडाशिक्षक अतुल शिरोले यांनी थोडक्यात माहिती सांगितले तेव्हा सर्व शिक्षकवर्ग व ग्रामस्त उपस्थित होते मिरणुक वेळी घरोघरी पाणी घालून व आरती करून सर्वांच स्वागत करत मिरणूक जोरदार केली
यासाठी शाळेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू (हलगेकर) यांचं बहुमूल्य प्रोत्साहन मिळत आहे
Recent Comments