Belagavi

रिअल इस्टेट उद्योगपती अंबी यांचे अपहरण; ५ कोटीं खंडणी देण्याची मागणी

Share

सांगलीहून शिरगुप्पीला येत असताना, गोकाक तालुक्यातील राजापूर गावातील रिअल इस्टेट व्यावसायिक बसवराज निल्लाप्पा अंबी यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून ५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली आहे.बसवराज यांच्या पत्नी शोभा यांनी घटप्रभा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी अपहरण करणारी टोळी काल रात्री फोन करून पाच कोटी रुपये दिल्यास तर मात्र, बसवराज निल्लाप्पा अंबी सुटका करण्यात येईल असे सांगतिले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपहरण झालेल्या व्यक्तीचा आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. फोन लोकेशनच्या आधारे दोन पथके शोध मोहीम राबवत आहेत.अपहरण करणारी टोळी सध्या बेळगाव जिल्ह्यातील निप्पानी येथे असल्याची माहिती आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags: