Uncategorized

कॅन्टोन्मेंटमधील सार्वजनिक क्षेत्रे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी ४ मार्च रोजी महत्वाची बैठक

Share

छावणी परिषदेच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रे महानगरपालिकेच्या अस्तित्वात समाविष्ट करण्यासाठी ४ मार्च रोजी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.

बेळगाव छावणी परिषदेच्या अस्तित्वातील सार्वजनिक क्षेत्रे बेळगाव महानगरपालिकेला देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, छावणी परिषदेने केवळ ११२ एकर जमीन महानगरपालिकेला देण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.मात्र ५ ते ६०० एकर सार्वजनिक जमीन छावणी परिषदेच्या अखरित्यात आहे यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तयार करून केंद्राला पाठवण्यात येईल. ४ मार्च रोजी एक विशेष बैठक आयोजित केली जाईल.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात फळे आणि भाज्यांसह विविध प्रकारचे धान्य पिकवले जाते.बेळगावहून गोव्यासह इतर राज्यांमध्ये भाज्यांची निर्यात केली जाते. या संदर्भात, सांब्रा विमानतळाजवळ शीतगृह आणि अन्न प्रक्रिया प्रकल्प बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे त्यांनी सांगितले. बाइट

केंद्र सरकारने बेळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त १०६ कोटी रुपये दिले आहेत. वंदे भारत रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात वेळेत बदल करून ही रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर ते प्रादेशिक आयुक्त आणि आमदार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
.

Tags: