Uncategorized

लाच स्वीकारताना वक्फ बोर्डाचे ऑडिटर आणि त्यांचा भाऊ लोकायुक्तांच्या जाळ्यात

Share

विजापूर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जिल्हा वक्फ बोर्डाचे लेखापरीक्षक आणि त्यांचा भाऊ लाच स्वीकारताना लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले.

वक्फ बोर्डाचे ऑडिटर मुहम्मद मोहसीन जमखंडी आणि त्यांचे भाऊ मुजाहिद जमखंडी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. दीड लाख रुपये घेताना कार्यालयावर छापा टाकणाऱ्या लोकायुक्तांनी दोन लोकांना ताब्यात घेतले आहे .त्यांची चौकशी करण्यात येत आहेत.

वक्फ अंतर्गत बोर्ड समितीचे नूतनीकरण करण्यासाठी लाच मागितली होती अशी माहिती असून खाजासाब नदाफ यांच्या तक्रारीवरून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ही छापा टाकला आहे.

Tags: