Banglore

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कठीण काम आहे…

Share

सिद्धरामय्या सध्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. सर्व चाहत्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. हे चाहत्यांचे प्रेम आहे. मला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते खूप कठीण काम आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

मंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सिद्धरामय्या यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदी राहावे असे म्हटल्यानंतर मी पुन्हा त्यावर चर्चा करणार नाही.सर्व चाहत्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. हे चाहत्यांचे प्रेम आहे. मला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते खूप कठीण काम आहे असे ते म्हणाले.

दलित परिषदेचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र , जर परिषदेसाठी तारीख ठरली कि, सर्वांना नक्कीच माहिती दिली जाईल. ते म्हणाले की, ही परिषद गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल.गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या हायकमांड भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दिल्ली हायकमांड हे मंदिरासारखे आहे. कोणीही भेटू शकते.पक्ष पुन्हा सत्तेत यावा यासाठी त्यांनी हायकमांडची भेट घेऊन चर्चा केली आहे.

Tags: