Belagavi

राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही… केवळ तुष्टीकरणाचीच चिंता आहे ; प्रमोद मुतालिक

Share

राज्य सरकारला फक्त तुष्टीकरणाची गरज आहे. हिंदूंना संरक्षणाची गरज नाही असे श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याबाबत म्हटले की, सरकारला शेतकऱ्यांची सुरक्षा आणि हिंदूंचे संरक्षण नकोय. फक्त मुस्लिमांनाच सुरक्षिततेची आवश्यकता भासत आहे. वक्फ कायद्यातील सुधारणेला विरोध करणे हा संविधानाचा अवमान आहे. जे हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येत नाहीत ते हिंदूंचे आणि देशाचे गद्दार आहेत.

जोपर्यंत काँग्रेस तुष्टीकरण करीत राहील तोपर्यंत हिंदूंवर अन्याय होतच राहील.हिंदूंवर हल्ला करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. पोलिसांवरही हल्ले होतात. भारतात एक व्यवस्था आहे. येथे गुंडागर्दी चालणार नाही असे म्हणाले.

Tags: