Belagavi

लव्ह जिहादच्या बळी पडलेल्या हिंदू महिलांच्या रक्षणासाठी श्री राम सेना तयार…

Share

कर्नाटकातील तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांनी लव्ह जिहादच्या पीडितांना संरक्षण देण्याचे आवाहन केल्यानंतर श्री राम सेना संघटना हे काम हाती घेतल्याचे श्री राम सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.

शुक्रवारी बेळगावमध्ये ‘लव्ह जिहाद’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या श्री राम सेना हेल्पलाइनवर फोन करून लव्ह जिहादच्या बळी पडलेल्या मुलींचे संरक्षण करण्याची विनंती केली होती. हिंदू महिलांची सुरक्षितता अमूल्य आहे. ते महिलांना भाज्यांसारखे कापत आहेत. राजकीय प्रतिनिधी महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत असा संताप व्यक्त केला. दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या १२ वर्षांनी आरोपींना शिक्षा झाली आहे. अशा न्यायालयीन व्यवस्थेचा निषेध आहे. बाइट

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस सरकारने तीन हजार शिखांची निर्घृण हत्या केली. न्यायालयाने आरोपीला सुनावलेली ४० वर्षांची शिक्षा न्यायालयाप्रती असलेला आदर कमी असल्याचे दशविते अशी नाराजी व्यक्त केली.लव्ह जिहाद वाढत चालला आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या मातांवर होणारे बलात्कार आपण थांबवू शकत नाही.२००९मध्ये छापलेले हे पुस्तक पुन्हा छापून प्रकाशित करण्यात आले आहे. जेणेकरून सर्वांना लव्ह जिहादबद्दल माहिती मिळेल, असे ते म्हणाले.

श्री राम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून लव्ह जिहादविरुद्ध लढत आहे. त्याने आधी लव्ह जिहाची थट्टा केली होती. आता संपूर्ण देश लव्ह जिहादविरुद्ध चर्चा करत आहे.

यावेळी श्री राम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, सुंदरेश, मधुश्री आणि इतर उपस्थित होते.

Tags: