Belagavi

बेळगाव महापालिकेतर्फे मेयर ट्रॉफी क्रीडा स्पर्धा

Share

बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी पार्क येथे आज महानगरपालिकेतर्फे मेयर ट्रॉफी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

महापौर सविता कांबळे यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महानगर पालिकेच्या आयुक्ता शुभा बी, अभियंत्या लक्ष्मी निप्पानीकर, पर्यावरण विभागाचे अधिकारी हणमंत कलादगी व इतर उपस्थित होते. या प्रसंगी खो-खो आणि कबड्डीसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता.

Tags: