Belagavi

मुडलगी-गुरलापुर रस्त्यावर भीषण अपघात

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी-गुरलापुर रस्त्यावर आज सकाळी दुचाकीस्वाराला ट्रॅक्टरने चिरडला. या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत .

बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील मुडलगी-गुरलापुर रस्त्यावर पहाटे ३.३७ वाजता स्कूटी आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आणि ट्रॅक्टरखाली पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरुन ट्रॅक्टर चालून गेल्याचे द्दष्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

मुडलगी तालुक्यातील खानट्टी गावातील सिद्धगिरेप्पा लंगोटी (२०) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. अपघातास कारणीभूत ट्रॅक्टर शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. मुडलगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Tags: