Belagavi

प्रादेशिक आयुक्तांना धमकावणे गुन्हा ठरेल

Share

आमदार अभय पाटील यांनी प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध विधान करणे हा गुन्हा ठरेल असे सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद म्हणाले.

बुधवारी ते बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खाऊ कट्ट्यामध्ये बेकायदेशीरपणे दुकान थाटल्याने प्रादेशिक आयुक्तांनी बेळगाव महानगर पालिकेच्या मंगेश पवार व जयंत जाधव या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. मात्र आमदार अभय पाटील यांनी आयएएस अधिकाऱ्यांना धमकावले आहेत. हे योग्य नाही. आमदार अभय पाटील यांनी प्रादेशिक आयुक्तांचा अपमान केला आहे.

अभय पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार अभय पाटील यांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना धमकी देणे योग्य नाही. या संदर्भात गृहमंत्री, राज्यपाल आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: