रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने वाहतुकीसाठी समस्या होत आहे तसेच धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे असून बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस परिसरातील स्थानिक असमाधान व्यक्त करीत आहेत.
बेळगाव छावणी परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदान पोस्ट ऑफिस परिसरातील रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे.रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पावसाळ्यापूर्वी माती घालण्यात आली होती. पावसाळ्यानंतर रस्ता निर्माण करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप रस्ता विकास न केल्याने जनतेतून तीव्र असमाधान व्यक्त होत आहे. योग्य रस्त्यांअभावी केवळ समस्याच निर्माण झाल्या नाहीत तर धुळीच्या साम्राज्यामुळे लोकही त्रस्त झाले आहेत.
येथील घरे आणि दुकाने धुळीने माखत आहेत . दिवसातून अनेक वेळा धूळ साफ करून थकले आहेत.येथील खाद्यपदार्थांची दुकाने धुळीने भरत असून या मुळे व्यवसायात व्यत्यय येत आहे. येथील दुकानदारांचे म्हणणे आहे की, धुळीमुळे ग्राहकांना त्रास होत आहे. लवकरात लवकर या रस्त्याचा विकास करा.

गेल्या २-३ महिन्यांपासून ही समस्या होत आहे. मात्र संबंधित छावणी परिषद रस्ता निर्माण करून समस्या सोडवण्याचा प्रयत्नही करत नाही. यामुळे येथील व्यापाऱ्यांना व्यवसाय नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. आपण या धुळीच्या साम्राज्यातून कधी मुक्त होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छावणी परिषद आता तरी जागे होऊन रस्त्याचे निर्माण करावी अशी मागणी होत आहे.


Recent Comments